आमच्याबद्दल

सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने " सर्व शिक्षा अभियान " उपक्रम सुरु केलेला आहे. सर्व शिक्षा अभियानातुन सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन गुणवत्ता पुर्ण शिक्षण दिले जाते. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार व गरजेनुसार शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जातो. समाजातील काही विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारच्या सहकार्याची आवश्यकता असते. यालाच "विशेष शैक्षणिक गरज" असे म्हटले जाते. विशेष गरज असलेल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे हे सर्व शिक्षा अभियानात समाविष्ट आहे. समाजात अंध, कर्णबधीर , मतिमंद , अस्थिव्यंग , वाचादोष, अशा अपंगत्व असलेल्या प्रकाराची मुले असतात. त्यांच्यासाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे हि समाजाची जबाबदारी आहे. ही संधी शाळेतुन मिळणाऱ्या औपचारीक शिक्षणातुन व समाजातुन मिळणाऱ्या अनौपचारीक शिक्षणातुन विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्व विकासाला पुरक ठरते.
सर्व सामान्य मुले शाळेत प्रवेश घेतात. तेव्हा ती शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होतात. परंतु काही कमजोर असलेली अक्षम असलेली (डीसेबल) अपंग मुले असतात. त्यांना शाळेतील सहकार्याबरोबर काही शालेय उपक्रमामध्ये व अध्ययनामध्ये अडचणी येतात. अश्या मुलांसाठी शालेय उपक्रमाची रचना ही वेगळया प्रकारची आवश्यक असते. अश्या स्थितीत ही मुले काय करु शकतात व काय करु शकत नाही याची माहिती असणे आवश्यक आहे. पारंपारिक विचार असा आहे की, दृष्टिहीन, कर्णबधीर , मतिमंद, बहुविकलांग , मनोविकृती असलेली मुले इतरांप्रमाणे काम करु शकत नाहीत. अश्या मुलांना घरीच अतिसुरक्षीत ठेवुन, शाळांमध्ये दाखल केले जात नाही. सर्व शिक्षा अभियान "समावेशित शिक्षण" उपक्रमामुळे हा दृष्टिकोण पुर्णपणे बदललेला आहे. प्रत्येक  मुलाचा आपल्या वयाच्या मुलाप्रमाणे शाळेत जाण्याचा व शिक्षणाचा हक्क आहे. अपंग मुले ही सुदधा समाजाचा एक घटक असुन या मुलांना काही प्रमाणात अध्ययनासंबंधी समस्या असतात. मानवी हक्कानुसार व त्यांच्या गरजेनुसार सुविधा देणे ही समाजाची जबाबदारी आहे. म्हणजे बालकेंन्द्रीत शिक्षण पदधतीमधील सर्व मुलांसाठी शाळा हे माध्यम समावेशीत शिक्षणाने मान्य केले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अपंग मुले शिक्षणापासुन मोठया प्रमाणात नकारात्मक दृष्टिकोनामुळे वंचीत असल्याचे निदर्शनास येते. समावेशित शिक्षणात प्रत्येक मुल हे गरजु मुल असते. म्हणुन शिक्षकांचे, लोकप्रतिनिधींचे, व पालकांचे प्रबोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. अपंग विद्यार्थ्यांना सुदधा शिक्षणाच्या वेगवेगळया संधी वेगवेगळया मार्गाने , पदधतीने उपलब्ध करुन देणे म्हणजेच समावेशक  शिक्षण होय.  समावेशक शिक्षण म्हणजे शिक्षण प्रवाहात सर्वांचा समावेश. समावेशिक शिक्षणासाठी पर्यायी शब्द आहे. ीन्च्ल्स्ुव्िए श्दुचत्ेन् ऋरेग्राम्म्ए .  विशेष गरजा असणारी मुले (छहल्दिरएन् द्वत्हि श्प्एच्ाल् श्दुचत्ेनल् ण्एएदर्स्छद्वश्ण्).  अपंग मुले ही समाजाचा अविभाज्य घटक  मानला आहे. विशेष गरजा शणाऱ्या मुलांच्या क्षमता अक्षमता या सर्वांचा साकल्याने विचार करुन सर्व समावेशक  शिक्षणात सर्वसामान्य शिक्षणाच्या कक्षा अधिक विकसीत केल्या गेल्या आहेत. जिल्हा, तालुक,े गट व केंन्द्र या प्रत्येक स्तरावर विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या विशेष गरजा पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक मुलाला त्याच्या घराजवळ वाडी वस्तीवर शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे यासाठी तालुकास्तरावर विशेष शिक्षकांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.     
समावेशक शिक्षणात अपंगाना (विशेष गरजा असणाऱ्या) दिल्या जाणाऱ्या विशेष सेवा.

  • अत्यावश्यक सेवा - Essential Services
  • सहाय्यभुत सेवा - Supportive Services
  • अशंतः सेवा PuripheralServices 
 
Login to access the data
* Required Data
Login :
Password :
 
 


मुख्य पान | आमच्याबद्दल | विभाग व् योजना | मदतनीस | संपर्क | फोटो गॅलरी | RTE Self Declaration
Copyright @ 2011 RMSA, Thane. All Rights Reserved. Designed & Developed by Zeal Tech Services